आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

कार्यक्रमास आमदार शेखर निकम उपस्थित.
Edited by: मनोज पवार
Published on: September 20, 2024 14:43 PM
views 166  views

रत्नागिरी : महाविद्यालयीन आणि पदवीधर युवक युवतींना रोजगारक्षम बनविणे व कृषि पुरक व्यवसाय वृद्धिंगत करणे आणि औद्योगिक प्रशिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध करून कौशल्य युक्त उद्योजक तयार करण्याच्या उद्देशातून प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील एक हजार शैक्षणिक संस्थांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास केंद्रांचे, उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने, आज शुक्रवार,  ता.२० सप्टेंबर रोजी १२.३० वाजता देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले . 

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या,  सह्याद्रि पॉलिटेक्निक,  सावर्डे आणि शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय,खरवते-दहिवली या आधुनिक सोयींनीयुक्त महाविद्यालयांमध्येही या विकास केंद्रांचा ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला.

 या योजनेंतर्गत महाविद्यालयामध्ये कृषि  आणि औद्योगिक शाखेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये कृषि महाविद्यालयात कृषि प्रक्षेत्र अधिकारी व रोपवाटिका व्यवस्थापक ई.विषयांचा समावेश आहे. तर सह्याद्री पॉलिटेक्निक आचार्य कौशल्य विकास केंद्रात  प्रामुख्याने आधुनिक औद्योगिक आवश्यक तंत्रज्ञान व कौशल्य याचा सखोल अभ्यास करून घेण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिक व्हेईकल  टेक्निशियन, थ्रीडी प्रिंटर ऑपरेटर ,सोशल मीडिया  इन्फ्लुएंसर यांचा समावेश आहे.

या कौशल्य विकास केंद्रामधुन जास्तीत जास्त बेरोजगार पदवीधरांना प्रशिक्षण देवुन आर्थिक  व सामाजिक दृष्टिकोनातून सक्षम बनविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांची निवड करण्यात आली असुन त्यांना नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कार्पोरेशन आॅफ ईंडीया व सेक्टर स्कील काॅउनसिल ,न्यु दिल्ली या नामांकित शासकीय संस्थांकडुन मानांकित करण्यात आले आहे. त्यामुळे चिपळूण संगमेश्वर तालुक्यातील महाविद्यालयीन युवक युवतीला उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.


या ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित आमदार शेखरजी निकम सर, डाॅ.सुनितकुमार पाटील, श्री.गेडाम (कार्यकारी अभियंता,महावितरण),श्री.ज्ञानदेव घाग(सरपंच, खरवते),.कल्पना घाग( सरपंच,दहिवली),श्री,रूपेश घाग (उपसरपंच,दहिवली),वैष्णवी लाड( सरपंच दहिवली खुर्द) आणि विद्यार्थी, पालक,  ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.