PM किसान समृद्धी केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच थेट प्रक्षेपण वैभववाडीत

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 27, 2023 19:48 PM
views 231  views

वैभववाडी : पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्राचा लोकार्पण सोहळ्याच थेट प्रक्षेपण वैभववाडीत दाखविण्यात आले.तालुका खरेदी विक्री संघाने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही सुविधा पंचायत समितीच्या सभागृहात उपलब्ध करून दिली होती.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 

    देशात आज एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २लाख ८हजार किसान समृद्धी सुविधा केंद्राचा  लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी  खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे, व्हा. अंबाजी हुबे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत,माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश संसारे, सुधीर नकाशे,प्राची तावडे, राजेंद्र राणे, पुंडलिक पाटील,सिमा नानीवडेकर,अक्षता डाफळे, डॉ राजेंद्र पाताडे,उत्तम सुतार यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.