आंगणेवाडीतील नूतन सुलभ प्रसाधनगृह उद्या लोकार्पण सोहळा !

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 25, 2024 13:39 PM
views 93  views

मालवण : आंगणेवाडी येथील प्राथमिक शाळेजवळच्या नूतन शौचालय बांधकामाचा लोकार्पण सोहळा उद्या ता. २६ रोजी सकाळी १२ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. 

या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सूक्ष्म, लघु, मध्यम केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, सहायक अभियंता अजित पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. 

पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सुविधांतर्गत सुमारे १ कोटी ६० लाख ८१ हजार ७४५ रुपये खर्च करत महिला व पुरुषांसाठी हे प्रसाधनगृह बांधण्यात आले आहे. प्रशाधनगृहाबरोबरच रेनवॉटर हार्वेस्टिंग, पाणी पुरवठा व जलनि:सारण आदी कामेही मार्गी लावण्यात आली आहेत. या प्रसाधनगृहामध्ये १३ युरोपियन वॉटर क्लोसेट, १६ इंडियन वॉटर क्लोसेट, ८ स्नानगृह, २ लॉकर खोली, ४ अपंग शौचालय, ४ चेंजिंग खोली, १ हिरकणी कक्ष, १६ वॉशबेसिन, १४ युरिनल्स आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मे. सिद्धी असोसिएटस यांनी मुदतीपूर्वीच हे काम मार्गी लावले आहे. यात्रेपूर्वी हे काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या कार्यक्रमास ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन आंगणे कुटुंबीय यांनी केले आहे.