
दोडामार्ग : हेवाळेत टस्कर हत्तीच्या दहशतीन परिसीमा गाठली. खराडी येथे घराच्या अंगणात लावलेल्या नव्या कोऱ्या क्रेटा कार वर काढला राग. कारची काच फोडली, आणि दरवाजाही चेपला. शेतीचा सपशेल फडशा. एकाच रात्री मोठ्या प्रमाणात माड बागायतींच नुकसान. नागरिकांत प्रचंड घबराट. शेतकऱ्यांत तीव्र संताप. वनखाते सुशेगात. ठोस उपायोजना आखण्यात होतेय दिरंगाई. अद्यापही हत्ती बाधित वनपरीमंडळ साठी नियमित वनपाल नाही. हेवाळेत २४ तास वनकर्मचारी पथक, हत्ती प्रतिबंधक केंद्र, हत्ती कॅम्प उभारण्याची जोरदार मागणी. काल गुरांच्या गोठ्यावर भेडला माड उन्मळून टाकल्या नंतर शनिवारच्या रात्री पुन्हा हेवाळे गावात घातला धुमाकूळ. शेती बागायती नुकसानी बरोबर घरासमोरील अंगणात लावलेल्या आलिशान कारचेही नुकसान केल्याने शेतकरी कमालीचे भीतीच्या छायेखाली.