वेंगुर्ल्यात यंदाही मुलींची बाजी

बॅ. खर्डेकर महाविद्याल विज्ञान शाखेची राजकुमारी हिंदुस्थानी संजय बगळे तालुक्यात प्रथम
Edited by: दिपेश परब
Published on: May 21, 2024 15:28 PM
views 99  views

वेंगुर्ले :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९८.३९ टक्के लागला. यात बॅ खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्लाच्या विज्ञान विभागाच्या राजकुमारी हिंदुस्थानी संजय बगळे हिने ९०.८४ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. वेंगुर्ला तालुक्यात ७४७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ७३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

बा. म. गोगटे कनिष्ट महाविद्यालय शिरोडा विज्ञान शाखेच्या सानिका जितेंद्र मोरजकर हिने ९०.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, बॅ खर्डेकर महाविद्यालय विज्ञान शाखेच्या सृष्टी अनिल मांजरेकर हिने ९०.३३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक, बा. म. गोगटे कनिष्ट महाविद्यालय शिरोडा वाणिज्य शाखेच्या सानिका नितीन सावंत हिने ९०.१७ टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक तर बॅ खर्डेकर महाविद्यालय विज्ञान शाखेच्या वेदिका विनायक परब हिने ८८.५० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला. यावर्षीही तालुक्यात मुलींनीच बाजी मारली. 

 वेंगुर्ले तालुक्यातील शाळा निहाय निकाल:-

श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरेत परीक्षेला बसलेल्या १२८ विद्यार्थ्यांमधून १२७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या महाविद्यालयाचा ९९.२१ टक्के निकाल लागला. या महाविद्यालयात कला शाखेतून २१ पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम श्रेया सागर परब हिला ८२ टक्के, द्वितीय चैताली कृष्णा राऊळ हिला ६९ टक्के तर तृतीय नेहा नरेंद्र गावडे हिला ६६.१७ टक्के मिळाले. वाणिज्य शाखेतील सर्व ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम प्रांजली प्रवीण माडये हिला ८५.३३ टक्के, द्वितीय हर्षदा संदीप सावंत हिला ७९ टक्के तर तृतीय सुश्मिता सुहास राऊळ हिला ७८.५० टक्के गुण मिळाले. तर स्वयंअर्थ सहाय्यीत विज्ञान शाखेचे सर्व ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेत प्रथम साक्षी राजेश चिटणीस हिला ८४.१७ टक्के, द्वितीय वैष्णवी उमेश धुरी हिला ८३.६७ टक्के तर तृतीय निशीता सखाराम पडवळ हिला ८० टक्के गुण मिळाले.

बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात परीक्षेला बसलेल्या २८६ विद्यार्थ्यांपैकी २८४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९९.३० टक्के निकाल लागला. यात विज्ञान विभागातील सर्व १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेत प्रथम राजकुमारी हिंदुस्थानी संजय बगळे हिला ९०.८३ टक्के, द्वितीय सृष्टी अनिल मांजरेकर हिला ९०.३३ टक्के तर तृतीय वेदिका विनायक परब हिला ८८.५० टक्के गुण मिळाले. कला शाखेतील ५१ पैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम दिव्या अरुण वेंगुर्लेकर हिला ७२.८३ टक्के, द्वितीय चैताली सदानंद करंगूटकर हिला ७१.८३ टक्के, तर तृतीय शंकर सचिन सारंग याला ७१.६७ टक्के गुण मिळाले. वाणिज्य विभागात सर्व ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम करिष्मा सद्गुरू तावडे हिला ७१.८३ टक्के, द्वितीय अर्चना संतोष परब हिला ६९.८३ टक्के, तृतीय सुहानी हरिश्चंद्र कोंडुसकर व जनार्दन लवू सावंत यांना ६९ टक्के गुण मिळाले. व्यवसाय अभ्यासक्रम विभागात सर्व ३७  विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम मुस्कान दस्तगीर पटेल सासाबाल हिला ७९.५० टक्के, द्वितीय विद्या रमेश कदम हिला ७४.८३ टक्के, तृतीय वसंत प्रकाश मातोंडकर याला ७४.३३ टक्के गुण मिळाले.

पाटकर हायस्कूल आणि रा सी रेगे ज्युनियर कॉलेज वेंगुर्लेत परीक्षेला बसलेले सर्व ६१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. या विद्यालयात कला शाखेतील सर्व ४ विद्यार्थी उतीर्ण झाले. यात प्रथम सुजल भिकाजी गावडे हिला ६२.१७ टक्के, द्वितीय साहिल आत्माराम सावंत याला ६१ टक्के, तृतीय देवेश सुरेंद्र परब याला ५८.१७ टक्के गुण मिळाले. वाणिज्य शाखेतील सर्व ३४ विद्यार्थी उतीर्ण झाले. यात प्रथम अपूर्वा अरुण पेडणेकर हिला ७०.६७ टक्के, द्वितीय कृपा श्याम खोबरेकर हिला ६९.१७ टक्के, तृतीय मयूरी दिलीप आरोलकर हिला ६८.८३ टक्के गुण मिळाले. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेतील सर्व २१ विद्यार्थी उतीर्ण झाले. यात प्रथम अनंत विश्वास पवार याला ८५.८३ टक्के, द्वितीय रिया विठ्ठल डिचोलकर हिला ७२ टक्के, तृतीय फॅल्सी मिंगेल रॉड्रिक्स हिला ७०.१७  टक्के गुण मिळाले.

बा.म. गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा विद्यालयात परीक्षेला बसलेल्या २७६ विद्यार्थ्यांपैकी २७० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९७.८३% निकाल लागला. या विद्यालयाच्या विज्ञान शाखेतील सर्व ११९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम सानिका जितेंद्र मोरजकर हिला ९०.६७ टक्के, द्वितीय हर्षाली गणेश मुळीक हिला ८७.६७ टक्के, तृतीय सेजल संजय भुबे हिला ८७.५० टक्के गुण मिळाले. वाणिज्य शाखेतून सर्व ७३ विद्यार्थी उतीर्ण झाले. यात प्रथम सानिका नितीन सावंत हिला ९०.१७ टक्के, द्वितीय हर्षिता लाडू शेंडेकर हिला ७९.१७ टक्के, तृतीय रामचंद्र मारुती राऊत व फिरदोसजहा महिबुल्ला महम्मद तैस याना ७९.१७ टक्के गुण मिळाले. कला शाखेतून २७ पैकी २५ विद्यार्थी उतीर्ण झाले. यात प्रथम राजश्री राजेश राळकर हिला ८७.१७ टक्के, द्वितीय निलक्षी विष्णू पेडणेकर हिला ७६ टक्के, तृतीय वैभवी सुधर्मा तांडेल हिला ७२ टक्के गुण मिळाले. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेतील ५७ पैकी ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम सावली सचिन तावडे हिला ८५.८३ टक्के, द्वितीय मैथिली शंकर जोशी हिला ८१.६७ टक्के तर तृतीय साक्षी सीताराम रेडकर हिला ८१.५०  टक्के गुण मिळाले.