वझरे-गिरोडेत ग्रामसमृद्धीच पॅनेलचा विजय पक्का | समीर म्हावसकरच सरपंचपदी बसणार!

विद्यमान सरपंच लक्ष्मण गवस यांना ठाम विश्वास
Edited by: संदीप देसाई
Published on: December 11, 2022 19:15 PM
views 283  views

दोडामार्ग : माजी सरपंच म्हणून खुल्या प्रवर्गातून पुन्हा थेट सरपंच पदाची निवडणूक लढविण्याची संधी असताना गावातील युवा व ग्रामविकासाची जाण व आवड असलेल्या उमेदवारला थेट सरपंच पदाची उमेदवारी देत वझरे-गिरोडे गावचे सरपंच लक्ष्मण गवस यांनी एक नवा आदर्श गावसमोर उभा केला आहे. त्यांनी  वझरे-गिरोडे ग्रामपंचायत मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर असलेल्या सुशिक्षित समीर लक्ष्मण म्हावसकर या तरुणाला सरपंच पदासाठी पूर्ण पाठिंबा देत आपण सदस्य म्हणून मार्गदर्शकाची भूमिका घेतली आहे. आपण २०१७  मध्ये थेट सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर गावासाठी गेल्या पांच वर्षात ४ कोटींहून अधिक रकमेची केलेली विकासकाम व जनतेच्या सामाजिक प्रश्नांची जाण आणि प्रलंबित विकासकामांचे परफेक्ट व्हीजन आपल्या व सहकार्‍यांच्या हाती असल्याने या पंचवार्षिक निवडणुकीत सुद्धा वझरे – गिरोडे गावची जनता आम्हालाच पहिली पसंती देतील असा ठाम विश्वास ग्रामसमृद्धी पॅनलच्या वतीन पॅनलप्रमुख तथा सरपंच लक्ष्मण गवस यांनी व्यक्त केलाय. 


   आमचे ब्यूरो चीफ संदीप देसाई यांच्याशी त्यांनी खास बातचीत करताना हा विश्वास व्यक्त केलाय. त्यांनी यावेळी आपला विकास अजेंठा जनतेसमोर मांडताना संगितले की, आपण  सरपंच असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करून आणलेला वझरे ते माटणे तळेवाडी हा 1 कोटी 77 लाखांचा महत्वपूर्ण रस्ता व 85 लाख निधीच वझरे - तळेखोल मुख्य रस्ता केळबाई मंदिर नजदिकचे नवीन पूल आणि गावासाठी वेदांताच्या माध्यमातून स्वखर्चाने सुरू केलेली मोफत रुग्णवाहिका ही गावच्या हिताची मोठी कामे मार्गी लागलीत.  त्याच जोरावर प्रभाग १ उमेदवार  लक्ष्मण दशरथ गवस, भाविका भूषण बांदेकर, शामल शांताराम भावे, प्रभाग मधून विकास अनंत गावडे तर प्रभाग ३ मंदार मंगेश सुतार हे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास गवस यांनी व्यक्त केलाय. मोहिनी मोहन खोत या सदस्या सुद्धा बिनविरोध विजयी झाल्याबद्दल त्यांनी त्यांचं अभिनंदन केल आहे. आणि सर्वांच्या सोबतीने या निवडणुकीत मोठ्या ताकदीने सामोरे जाण्याची तयारी केली असून जनेतेतून सुद्धा लक्ष्मण गवस यांच्या ग्राम समृद्धि पॅनल ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

   त्यांनी समीर म्हावसकर यांना सरपंच पदासाठी उमेदवारी दिली आहे तर प्रभाग १ उमेदवार मधून 

स्वतः लक्ष्मण दशरथ गवस, भूमिका भूषण बांदेकर व शामल शांताराम भावे हे उमेदवार तर प्रभाग २ मधुन विकास अनंत गावडे व प्रभाग ३ मधून मंदार मंगेश सुतार आदि उमेदवार निवडणूक लढवत असून सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होती असा विश्वास लक्ष्मण गवस यांनी व्यक्त केला आहे. 

       ते म्हणाले की, आम्ही गेल्या पाच वर्षात - तळेखोल मुख्य रस्ता केळबाई मंदिर येथ 85 लाख निधीच नवीन वझरे पूल, वझरे ते माटणे तळेवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 1.77 लाखांचा महत्वपूर्ण रस्ता, वझरे खोतवाडी ते उदय शंकर वझे यांच्या घरापर्यंत रस्ता,  घोडगाचेवाडी सार्वजनिक विहीर ते दिनेश सदाशिव सावंत घरापर्यंत रस्ता, मळेवाडी-तळेखोल रस्ता, लक्ष्मण सदाशिव सुतार रस्ता खडीकरणं रस्ता , वझरे मळेवाडीत स्ट्रीटलाईट,  केळबाई, गावठाणवडीत हायमास्ट, हळदीचा गुंडा व तेल देवणा येथे बंधारे, वझरे गावठाणवडी व गिरोडे येथे बोअरवेल, गिरोडे येथे स्मशानशेड, गिरोडे येथे गणेश विसर्जन तळी, गिरोडे सार्वजनिक विहीर, गिरोडे ते घोडगाचीवाडी नवीन पाईपलाईन, तिर्डीकरवाडी स्ट्रीट लाईट व सार्वजनिक विहीर, वझरे गावासाठी उपआरोग्य ही विकासकामे मार्गी लावली आहेत. तर वझरे उप आरोग्यकेंद्र साठी जागा मिळवून इमारत मंजूर करून घेतली आहे,  खोतवाडी स्मशानशेड मंजुरी,  स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी वेदांता कडे पाठपुरावा सुरू आहे. इयतकेच नव्हे तर आरोग्य सुविधा सक्षम होण्यासाठी वेदांता कडे पाठपुरावा करून हक्काची येथील जनतेसाठी रुग्णवाहिका मिळविली असून तिचा मेंटनस स्वतः सरपंच लक्ष्मन गवस हेच करत आहेत. इयतकेश नव्हे तर शाळेसाठी दोन रूम प्लास्टर, मराठी शाळेजवळ संरक्षक भिंत, शाळा छप्पर दुरुस्तीमहिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून स्वयंरोजगारकरिता कापडी पिशव्या तयार करणे प्रशिक्षण, गावातील सुमारे ३०० लोकांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा, व्हिजन हॉस्पिटलच्या माध्यमातून सरपंच व त्यांचे सहकारी गुरुदास पेडणेकर गोवा बिचोली यांच्या माध्यमातून व्हिजन हॉस्पिटलकडून चंद्रकांत शेटये यांनी १२  ऑपरेशन मोफत त्यापैकी ७ जणांनी लाभ घेतला आहे. 

तर आगामी काळात मंजूर असलेली उप आरोग्य केंद्र इमारत पूर्ण करणे, गिरोडे खराब झालेला रस्ता पूर्ण करून गैरसोय दूर करणे, वझरे मळेवाडी येथील रस्ता खडी व डांबरीकरण करून घेण , खोत काळकेकरवाडी, भरडवाडी, जाधववाडी, नळयोजना मंजूर करून पाणी प्रश्न मार्गी लावणे , गिरोडे मंदिर जवळ मंजूर असलेला bsnl टॉवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे , घोडगाची वाडी गणपती विसर्जन सभामंडप बांधणे, नागरिकांना विरंगुळा साधन मिळाव यासाठी गार्डन, नागरिक व शालेय विधायरथी यांसाठी सुसज्ज वाचनालय, आवश्यक ठिकाणी बसथांबे, खोतवाडी मंदिर जवळ सभामंडप उभारणे, गावासाठी कंपनीनं दिलेली रुग्णवाहिका यापुढे सुद्धा विना मोबदला उपलब्ध ठेवणे, पात्र लाभार्थी यांना वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यासाठी काम करणे,  गिरोडे येथे बीएसएनएल किंवा जिओचा मोबाईल टॉवर उभारण्यासाठी प्रयत्न करणे व सर व पात्र लाभार्थी यांना किसान सन्मान योजना, महाराष्ट्र रोजगार हमी योजना, संजय गांधी निराधार योजना लाभ मिवून देणे, स्मार्ट ग्रामपंचायत, स्वच्छ सुंदर व समृद्ध करण्यासाठी लोकसहभागतून पंचायत राज मधील प्रत्येक अभियान यापुढे सुद्धा आम्ही राबवण्यासाठी सज्ज असू अशी घ्वही ग्रामसमृद्धी पॅनलच्या वतीने देत जनतेने आपल्या पॅनलच्या सर्व उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले आहे. 

विजय आमचाच 

आम्ही गेल्या पाच वर्षात केलेलं काम, आणि गेल्या १० वर्षांचा ग्रामविकासतील प्रदीर्ग अनुभव यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबं आणि नागरिकांपर्यन्त ग्रामपंचायच्या माध्यमातून पोहचविणार असल्याने गावातील जनता आम्हांलाच पहिली पसंदी देणार याची खात्री असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.