साकेडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या समीक्षा परब बिनविरोध

नवनिर्वाचित ग्रा. प. सदस्य यांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी केला सत्कार
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 08, 2023 17:52 PM
views 178  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील साकेडी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार समीक्षा संतोष परब या बिनविरोध निवडून आल्या. साकेडी ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 3 मध्यें सर्वसाधारण महिला या एका जागेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. एका जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या दोघांचे अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये समीक्षा संतोष परब व मंगला विजिन जाधव यांचे अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या मंगला विजीन जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ठाकरे गटाच्या समीक्षा संतोष परब या बिनविरोध निवडून आल्या. या निवडीनंतर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी नवनिर्वाचित सदस्य समीक्षा परब यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत अरविंद राणे, संदीप राणे, सुरज वर्दम, प्रदीप मेस्त्री, संतोष परब, राजा परब आदी उपस्थित होते.