
देवगड :आजच्या जमान्यात भजनाला अत्यंत महत्व आहे. आपण एकत्र येतो तेव्हा समाजातील एकजूट लक्षात येते आणि एकीचे दर्शन होते. अनेक बुवा आज सिंधुदुर्गात आहेत. येत्या पाच सहा महिन्यात सर्व सिंधुदुर्गातील भजनी बुवांना एकत्र करून मोठा भजनी मेळावा घेणार असल्याची घोषणा विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी केली.
देवगड आरेफाटा येथील गुरुदास चौक येथे बुवा कै. चंद्रकांत काशिराम कदम मार्ग येथे आयोजित गुरूदाससमय आनंद सोहळा २०२२ कार्यक्रमात विशाल परब बोलत होते.
विशाल परब म्हणाले, येथे प्रति पंढरपूर येथे तुम्ही निर्माण केलात. आजचा कार्यक्रम आगळावेगळा आहे. प्रकाश पारकर यांनी भजनाची ओढ जपत एक भजनाची मुहुर्तमेढ रोवली आहे. कानडे बुवासारखे बुवा जे समाजात लोकप्रतिनिधीसारख काम करीत आहेत.या सर्वांच्या कार्यालय सदैव माझ्या शुभेच्छा आहेत.