प्राथ. शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांची बदली ; प्राथ. शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्गच्यावतीने सन्मान

Edited by: देवयानी वरसकर
Published on: August 03, 2023 12:03 PM
views 132  views

सिंधुदुर्ग : प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांची सांगली जि प प्राथमिक शिक्षणाधिकारी (योजना ) येथे बदली झाल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्गकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार पर शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांभवडेकर, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने ,जिल्हा कार्या.चिटणीस आपा सावंत, जुनी पेन्शनचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक समिती शिलेदार राजू वजराटकर, मालवण तालुकाध्यक्ष सुयोग धामापूरकर, कार्याध्यक्ष रूपेश गरूडआदी उपस्थित होते.