टॅलेंट सर्च परीक्षेत जि. प. शाळा ४ चं उल्लेखनीय यश

Edited by: विनायक गावस
Published on: April 07, 2024 09:29 AM
views 287  views

सावंतवाडी : सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.४ ला उल्लेखनीय यश प्राप्त झाले आहे. कु. पार्थ शैलेश मयेकर, कु. स्वानंदी बाबासाहेब पाटील, कु. आदित्य पियुष येजरे यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. महाराष्ट्रातील अत्यंत मानाच्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.४ ला उल्लेखनीय यश प्राप्त झाले आहे. या प्रशाळेतील ७ विद्यार्थांनी सुवर्ण पदक, ७ रौप्य पदक तर ८ कास्य पदक आपल्या शाळेची मान उंचावली आहे. 

सुवर्ण पदकाचे मानकरी पार्थ शैलेश मयेकर, स्वानंदी बाबासाहेब पाटील,आदित्य पियुष येजरे इयत्ता दुसरी मिताली संदीप चव्हाण, अन्वी केदार म्हस्कर इयत्ता तिसरी तर वरद संतोष बाबर, वीरा राजीव घाडी इयत्ता चौथी हे विद्यार्थी सुवर्ण पडकाचे मानकरी ठरले आहेत. रौप्य पदकचे मयुरेश सुभाष राणे, प्रिया प्रकाश मेस्त्री, बसवराज परशुराम तुंबगी, श्रीशा पवन वनव,भूमी प्रकाश गावडे इयत्ता दुसरी राजवीरसिंह अनंत देसाई, सिया अभिजीत शेटकर इयत्ता तिसरी यांना रौप्य पदक तर  

कास्य पदक वीर सुनील करडे इयत्ता दुसरी, आराध्य अमित सावंत, आराध्या विजय गावडेइयत्ता तिसरी, दर्श मंगेशराव सावंत,काव्या अमित तळवणेकर इयत्ता चौथी, हर्ष रवींद्रनाथ गोसावी,दूर्वा हेमंत गोसावी,आर्या दत्तप्रसाद राऊळ यांनी कास्य पदक प्राप्त केले आहे.या यशासाठी श्रीम.सुजाता शिवाजी पवार, श्रीम.प्रणिती बाबुराव सावंत,श्रीम.अन्वी आनंद धोंड,श्रीम.लक्ष्मी लक्ष्मण धारगळकर,श्रीम.राजेंदु केशव पित्रे, मुख्याध्यापक ध्रुवसिंग हुरज्या पावरा,श्री. महेश विष्णू पालव, अंजना घाडी आदी शिक्षक वृद्धांचे मार्गदर्शन लाभले. तर शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, माता पालक संघ पदाधिकारी, समस्थ पालक वर्ग, व ग्रामस्थ यांनी अभिनंदन तसेच त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.