
सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून रसायन शास्त्र, हिंदी, इंग्रजी व भूगोल या विषयांना शिक्षण क्षेत्रातील उच्च पदवी पी.एचडी. प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाची मान्यता प्राप्त झाली आहे. यापूर्वी ही महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभाग व वनस्पती शास्त्र विभागा मध्ये पी.एचडी. शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना पी.एचडी. प्राप्त झालेली आहे. तर काही विद्यार्थी संशोधन करत आहेत.
शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासून मुंबई विद्यापीठाने रसायन शास्त्र, हिंदी, इंग्रजी व भूगोल या विभागासाठी पी.एचडी. संशोधन केंद्राची मान्यता दिलेली आहे. पी.एचडी. प्रवेशासाठी पात्रता मुंबई विद्यापीठाची PET (Ph.D. eligibility test) परीक्षा उत्तीर्ण, नेट / सेट परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. डी. बी. शिंदे (रसायन शास्त्र विभाग) मोबा.7066175697, प्रा. डॉ. डी. जी. बोर्डे (हिंदी विभाग) मोबा.9403369301,.प्रा. डॉ. पी. जी. नाईक.( इंग्रजी विभाग) मोबा. 9359516701, प्रा. डॉ. बी. एन. हिरामणी, (इंग्रजी विभाग) मोबा.9421145180, प्रा डॉ. एस. एम. बुवा (भूगोल विभाग) मोबा.9422810226 यांच्याशी संपर्क साधावा. असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी आवाहन केले आहे.