सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात लोकसभेपेक्षा मतदानाचा टक्का वाढला आहे. ७१.५५ टक्के एवढ मतदान सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्गमधून झालं आहे. सहा उमेदवार रिंगणात असून मुख्यत्वे चौरंगी लढत इथे होत आहे. वाढलेलं मतदान बघता वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 71.55% एवढे मतदान झाले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 84 हजार 972 पुरुष आणि 79 हजार 590 स्त्री मिळून एकूण 1 लाख 64 हजार 562 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकसभेला 1 लाख 49 हजार 243 एवढं मतदान झालं होत. त्या तुलनेत 15 हजार 283 एवढं अधिकच मतदान झालं आहे.
चौरंगी लढतीत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली, अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब, विशाल परब यांच्यापैकी हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? हे पहावं लागेल. वाढलेली टक्केवारी कोणाला संधी देतेय हे शनिवारी स्पष्ट होणार आहे.