
दोडामार्ग : साळ - खोलपेवाडी येथील केळेश्वर देवस्थानचा शनिवारी जत्रोत्सव होत आहे. यानिमित्त वार्षिक कार्यक्रम होणार आहेत. मात्र यावर्षी सिद्धेश उर्फ राजू भोसले आणि कुटुंबियांकडून सायकल ब्रँड कंपनीची १० फूट उंच अखंड ज्योत अगरबत्ती देवाचरणी अर्पण केली आहे.
दुपारी २ वाजता ही अगरबत्ती प्रज्वलीत केली. जवळपास तीन दिवस ही अगरबत्ती पेटत राहणार आहे. याचबरोबर ६ फूट दुसरी अगरबत्तीही प्रज्वलीत करण्यात आली