कणकवलीत ४ मार्चला रोजगार स्वयंरोजगार मेळावा...!

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आयोजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 02, 2024 15:34 PM
views 153  views

कणकवली :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक व युवती तसेच नवीन उद्योजकांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग पंडीत दीनदयाळ उपाध्याय भव्य महारोजगार व स्वयंरोजगार मेळावा सोमवार ४ मार्च २०२४ रोजी कणकवली कॉलेज कणकवली येथे  आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आयोजित केला आहे. 

यासाठी दहावी, बारावी, पदवीधर, आय.टी.आय., इंजिनिअरींग, अॅग्रीकल्चर डिप्लोमा तसेच इतर शैक्षणिक पात्रतेनुसार ऑटोमोबाईल, बॅंकींग, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, टिचींग, मार्केटींग, मॅकॅनिक, आय.टी.आय.संबंधी ट्रेड,अॅग्रीकल्चर यासारख्या क्षेत्रामध्ये ४०० पेक्षा जास्त पदांच्या रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे स्वयंरोजगार करण्यास इच्छुक उमेदवारांकरीता शासनाच्या विविध मंडळाची बीज भांडवल पुरवठा करणाऱ्या शासकीय योजनांची माहीती देण्यात येणार आहे.उमेदवारांनी रोजगार मेळावा सहभागासाठी www.Rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे,बायोडाटा सह रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.