परमहंस भालचंद्र महाराज मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

Edited by:
Published on: July 21, 2024 13:56 PM
views 153  views

कणकवली : परमहंस भालचंद्र महाराज संस्थानात आज गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळपासूनच बाबांच्या शिष्यांनी आपल्या गुरुचरणी लीन होत दर्शन घेतले. सकाळपासूनच मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होती. बाबांच्या समाधी स्थानी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटे ५.३० ते ७ समाधी पूजा, काकडआरती, जपानुष्ठान, सकाळी ७ ते ११ सर्व भक्तांच्यावतीने पाद्यपूजा आणि अभिषेक, दुपारी १०.३० ते १२.३० श्री सत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी १ वा. तीर्थप्रसाद, महाप्रसाद, दुपारी १ ते ६ सुश्राव्य भजने, सायंकाळी ७ वा. धुपारती, रात्रौ ८ वा. बाबांची दैनंदिन आरती असे विविध कार्यक्रम पार पडले.