दोडामार्ग तालुक्यात विशाल परब यांचा झंझावात

नवरात्रोत्सव मंडळाना दिल्या भेटी | सामाजिक बांधिलकीमुळे गावोगावी उत्साही वातावरण
Edited by:
Published on: October 06, 2024 09:56 AM
views 140  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील नवरात्रोत्सवात युवा नेते विशाल परब यांनी गावोगावी विविध मंडळ व मंदिरात भेटी देऊन एक संपर्क अभियान झंजावात निर्माण केला आहे. तालुक्यात नवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. तालुक्यातील प्रत्येक गावात दुर्गामातेचे पूजन आणि नऊ दिवसांचा हा सोहळा अत्यंत उत्साही आणि आनंदमय वातावरणात पार पडतो. दररोज सांस्कृतिक कार्यक्रम, भजने, सप्तसूर गायन, दशावतारी नाटके आणि महिला भगिनींसाठी दांडिया यांसारख्या कार्यक्रमांनी वातावरण अधिक रंगतदार बनते.

 याच पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तालुक्यातील विविध दुर्गामाता मंडळांना भेट देत झंझावाती दौरा केला. नवरात्र उत्सव मंडळ पिंपळेश्वर कट्टा दोडामार्ग, सातेरी देवी कसई, नवरात्र उत्सव काजूवाडी-धनगरवाडी, दुर्गा माता उत्सव साटेली वरचा बाजार, गणराया आदर्श मंडळ साटेली, शिवशक्ती मंडळ पाळये, सातेरी भावई मंदिर लोंढेवाडी-पाळये, खंडेराया भवानी प्रसन्न मंडळ कोनाळ, सातेरी देवी मांगेली, मारुती देवी कुसगेवाडी, शांतादुर्गा मंडळ खोक्रल, शारदा मंडळ कुडासे, अशा विविध ठिकाणी भेट देऊन त्यांनी मंडळांना कौतुकाची थाप दिली.*

या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांच्यासोबत माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस,शहर अध्यक्ष राजेश फुलारी, खोक्रल सरपंच देवा शेटकर, माजी युवा मोर्चा अध्यक्ष अमित गवस, सोशल मिडिया प्रमुख शिरिष नाईक,राकेश गवड, विशाल चव्हाण, नगरसेवीका संध्या प्रसादी, नगरसेवक नितीन मणेरीकर, रामचंद्र मणेरिकर ,दिपिका मयेकर,  वैभव सुतार,, रत्नकांत चारी, भैय्या पांगम, हसिना शेख,नेहा ठाकूर,विजय गवस,नारायण गवस, देवस्थान समितीचे अध्यक्ष सातू गवस, विश्वनाथ गवस, रामदास गवस,बाळू गवस, तुकाराम दळवी, उत्तम दळवी,बबन दळवी, कृष्णा दळवी , देवस्थान समितीचे अध्यक्ष मोतीराम गवस, कृष्णा गवस, दत्ताराम गवस,बुध अध्यक्ष नवनाथ साळसकर,रामदास गवस, पांडुरंग गवस, शिवाजी लोंढे,पांडू लोंढे,भटू लोंढे,नंदू टोपले,प्रदिप टोपले,दादा महाजन, रामदास धरणे,वैभव सुतार, सुर्यकांत धरणे,दिव्या देसाई, बाळू गावडे, रत्नकांत चारी,सिनारी सर,तळणकर सर,महेंद चारी, प्रशांत नाईक, शाणी बोर्डेकर,विशाल मणेरिकर, सुधीर चांदेलकर,समीर सडेकर आदि उपस्थित होते.