डिजिटल जमान्यात वैज्ञानिक प्रयोगाशिवाय पर्याय नाही : मकरंद तोरसकर

पिकुळे येथे 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप
Edited by: संदीप देसाई
Published on: January 14, 2023 15:14 PM
views 138  views

दोडामार्ग : तंत्रज्ञानाची कास धरून अनेक वैज्ञानिक प्रयोग केल्यास या प्रयोगात सातत्य राखल्यास यश निश्चित आहे.  यासाठीच जिद्द, मेहनत व चिकाटी कायम राखून सातत्याने प्रयोगशील राहा, तरच आपण वैज्ञानिक चमत्कार साधू शकता. त्यामुळे वैज्ञानिक प्रयोगात यश न मिळाल्याने नाराज न होता पुन्हा पुन्हा प्रयत्न करावेत, यश हमखास मिळेल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेले विद्यार्थी भविष्यात मोठे यश संपादन करतील, असे प्रतिपादन धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई  संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर यांनी केले. 

पिकुळे येथे आयोजित दोडामार्ग तालुकास्तरीय ५० व्या विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण आणि समारोप नुकताच सपंन्न झाला. यावेळी ते बोलत होते. त्यांचे समवेत व्यासीठावर माजी मुख्याध्यापक सदाशिव गवस, दोडामार्ग पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी नासीर नदाप, विस्तार अधिकारी दीपा दळवी, केंद्रप्रमुख श्रीम.राजलक्ष्मी लोंढे, सुर्यकांत नाईक, गुरुदास कुबल आप्पासाहेब हरमलकर, मुख्याध्यापिका स्नेहल गवस प्रा. सोनम सुतार, गटसाधन केंद्राचे कर्मचारी, परीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विज्ञान प्रतिकृती, अध्यापक निर्मित शै.साहित्य, प्रयोगशाळा परिचर-सहाय्यक प्रतिकृती,निबंध स्पर्धा, वक्तत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ स्वयंसेवक-विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दोडामार्ग तालुक्यात पिकुळे प्रशालेत  प्रदर्शनाच्या सुंदर आणि भव्यदिव्य आयोजनाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक स्नेहल गवस व  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे तोरसकर यांनी  अभिनंदन  केले. 

सूत्रसंचालन प्रशालेचे सहा.शिक्षक परेश देसाई यांनी केले. तर मुख्याध्यापिका स्नेहल गवस यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले.