
देवगड : श्री गणेश चतुर्थी सणाला गणेशमूर्ती च्या डोक्यावर मंडपी ला सामान बांधलं जातं. त्यात फळ,आंब्याचे टाळ,श्रीफळ, कवंडाळ,कांगण्या,हरणेअशा निसर्गाच्या सानिध्यातील फुलोऱ्यात विविधांगी फळ असतात. या मंडपी सामानाने देवगडतील शहरातील बाजारपेठ फुलल्या आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी सामान गोळा करून विक्रीसाठी बाजारात गर्दी केली आहे.
हरितालिका गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर मंडपी सामान,भाजी पाला, फळं, फुले मोठ्या प्रमाणात विक्री होतात. त्यामुळे काहींना रोजगार उपलब्ध होत असल्याने गणपती सणाच्या अगोदर तीन दिवस विक्री करण्यासाठी शेतकरी, विक्रेते बसून असतात. देवगड बाजारपेठेत आजपासून गर्दी झाली आहे. आज हरितालिका गणपती सणासाठी खरेदी विक्री वाढली आहे.