बीडवाडीत उबाठा शिवसेनेला खिंडार..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 01, 2024 13:51 PM
views 458  views

कणकवली : ऐन निवडणुकीच्या तोंडावर कणकवलीत बिडवाडी येथील उबाठा सेनेचे माजी शाखाप्रमुख पांडुरंग आत्माराम मगर व रामचंद्र घाडी यांनी आज कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केल्याने उबाठा सेनेला हा धक्का मानला जात आहे. 

यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत, मनोज रावराणे, सुरेश सावंत, संदीप सावंत, सरपंच पुजा चव्हाण, अनुष्का चव्हाण, प्रशांत चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, आनंद साटम, संजय साळसकर, अनंत मगर, ओमकार चव्हाण, सोमनाथ चव्हाण, रवींद्र तेली, रमेश जांबवडेकर पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते.