
सावंतवाडी : सावंतवाडीतील सालईवाडा येथील निवृत्त शिक्षिका शुभांगी नार्वेकर यांच्या घरात पावसाचं पाणी शिरल. बाजूच्या बिल्डिंगसाठी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न मिळाल्यामुळे हा प्रकार घडल्याचा त्यांचा आरोप आहे.
शुभांगी नार्वेकर यांच्या घराशेजारी निर्माण नावाची बिल्डिंग आहे. त्यांनी संरक्षक भिंत बांधली. या भिंतीविरोधात त्यांनी मागच्या 1 वर्षापासून आवाज उठवलाय. ही भिंत त्यांच्या जागेत येते असाही त्यांचा आरोप आहे. अगदी भूमिअभिलेख तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडेही त्यांनी तक्रार केली. मात्र आता पावसात त्यांना याचा फटका बसलाय. त्यानंतर त्यांनी नगरपालिकेत धाव घेतली आणि मुख्याधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं. मात्र, पाऊस काहीसा ओसरल्याने दिलासा मिळालाय. तरीही भविष्यात नार्वेकर कुटुंबियांना या त्रासाला पुन्हा समोर जावं लागू शकतं.