कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट ; असं आहे मान्सून वेळापत्रक

रेल्वे गाड्यांचा वेग मंदावणार
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 10, 2023 11:37 AM
views 1145  views

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल ३७ गाड्यांचा वेग आजपासून मंदावणार आहे. अतिवृष्टीत गाड्यांचा वेग ४० किमी प्रति तासी राहणार असून गाड्या प्रत्येक स्थानकावर नियमित वेळापत्रका पेक्षा एक ते दोन तास लवकर येणार आहेत. मॉन्सून कालावधीसाठी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक असे आहे.


 मुंबई ते मेंगलोर : ही गाडी सीएसएमटी येथून रात्री १०.०२ वाजता सुटून ठाण्यात १०.४५ वाजता, रत्नागिरी पहाटे ४.१०, कणकवली सकाळी ६.१० वाजता, मंडगावला ८.५० तर मंगळूरला दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४० वाजता पोहोचेल. परतीसाठी मंगळूर येथून सायंकाळी ४.३५ वाजता सुटून मंडगावला रात्री १० वाजता, कणकवली रात्री ११.५४, रत्नागिरी मध्यरात्री २.२५, ठाणे सकाळी ९.४० तर सीएसटीएमला सकाळी १०.३५ वाजता पोहोचेल. 


कोकण कन्या एक्सप्रेस : मुंबई सीएसटी येथून रात्री ११.५ वाजता सुटेल. दादरला ११.२०, ठाणे ११.५० रत्नागिरी पहाटे ५.३०, वैभववाडी सकाळी ७.६, कणकवली ७.४०, सिंधुदुर्ग ७.५७, कुडाळ ८.१०, सावंतवाडी ८.४२ वाजता पोहोचेल. परतीसाठी मडगाव येथून सायंकाळी ६ वाजता सुटून सावंतवाडीला ७.३०, कुडाळ ७.५२, सिंधुदुर्गनगरी ८.०४, कणकवली ८.५६ रत्नागिरी १०.५५ ठाणे पहाटे ४.४२२, दादर ५.१२, सीएसटीएमला ५.४० वा. पोहोचेल.


 सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस : दादर येथून मध्यरात्री १२.५ वा. सुटून ठाण्याला १२.३५, रत्नागिरीला सकाळी ७.५०, वैभववाडी ९.३०, कणकवली १०.१६, सिंधुदुर्ग १०.३८, कुडाळ १०.५२ तर सावंतवाडीला ११.३० वा. पोहोचेल. परतीसाठी सायंकाळी ५.५५ वाजता सुटून कुडाळ ६.१४, सिंधुदुर्ग ६.२६, कणकवली ६.४६, वैभववाडी ७.२०,दादरला सकाळी ६.४० वाजता पोहोचेल. 


तेजस एक्सप्रेस : मुंबईहून ५.५० वा.पहाटे सुटून दादर ६.२, ठाणे ६.२५, रत्नागिरी ११.५५, कुडाळ २.३२,वाजता पोहोचेल. परतीसाठी मंडगाव येथून दुपारी १२.२५ वा.सुटून कुडाळला दुपारी २.०० रत्नागिरी ५.२५ दादरला ११.३० वा. पोहोचेल


दिवा सावंतवाडी : ही गाडी दिवा येथून सकाळी ६.२५ वाजता सुटून रत्नागिरी येथे दुपारी २ वाजता, वैभववाडी ३.५५, कणकवली ४.३४, कुडाळ ५.११ तर सावंतवाडीला ६.३० वा. पोहोचेल. परतीसाठी सकाळी सावंतवाडी येथून ८.१५ वाजता सुटून कुडाळ ८.३८, कणकवली ९.१०, वैभववाडी ९.५५, रत्नागिरी १२.५ तर दिवा रात्री ८.१० वा. पोहोचेल.


 मांडवी एक्सप्रेस : मुंबईतून सकाळी ७.१० वा. सुटून दादर ७.२५, ठाणे ७.५५,५ रत्नागिरी २.४०, वैभववाडी ४.५८, कणकवली ५.३२, कुडाळ ६.१६, सावंतवाडी ७.०२ मडगावला रात्री ९.४५ वा पोहोचेल. मुंबईकडे जाताना मडगाव येथून सकाळी ८.३० वाजता सुटून सावंतवाडीला १० वाजता, कुडाळ १०.२२, सिंधुदुर्ग १०३८, कणकवली ११.००, वैभववाडी ११.३०, रत्नागिरी दुपारी २, ठाण्याला रात्री ८.३७, तर दादरला ९.०७ वा पोहोचेल. 


याचबरोबर लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. या बदलाची आणि बदललेल्या वेळांची माहिती प्रवाशांनी घ्यावी असे आव्हान रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.