मुंबई - गोवा महामार्गाबाबत मंत्री रवींद्र चव्हाण यांचं महत्वाचं विधान...!

Edited by: भरत केसरकर
Published on: August 22, 2023 13:11 PM
views 720  views

सिंधुदुर्ग : पनवेल ते सिंधुदुर्ग पर्यंत जाणारा मुंबई गोवा महामार्गावरील महामार्ग ची एक लेन 100% पूर्ण होईल असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. सिंधुदुर्ग बॉर्डर पासून बांदापर्यंत दोन्ही लेन पूर्ण झाल्या आहेत. तर पनवेल पासून सिंधुदुर्ग बाॅर्डर पर्यंत नऊ मीटरची एक सिंगल लेन 100% ही 10 सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. यामुळे गणेश चतुर्थी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही वाहतुकीस त्रास होणार नाही.

असे सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. तर उर्वरित दुसरी लेन डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण होऊन हा महामार्ग वाहतूकीला खुला होईल असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. मुंबईमधील एका खाजगी वाहिनीला मुलाखत देताना ते बोलत होते.