
दोडामार्ग : गोवा येथून अल्टो कार घेऊन आयी रोडवरून दोडामार्ग येथे येत असताना दोडामार्ग बाजारपेठेत रस्त्यावर कार उभी करून पोलिसांशी हुज्जत घालणे व वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी चार जणांवर दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे
वाहतूक पोलीस विजय सुरेश जाधव यांनी त्यांच्या विरोधात कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. बाजारपेठ येथे कार बाजूला करायला सांगितले असता कार चालक व इतरांनी खाली उतरून जाधव पोलिस यांच्याशी हुज्जत घातली. याची खबर दोडामार्ग पोलीस ठाण्यात समजताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन गोवा येथील चार जणांना ताब्यात घेऊन त्यांना दोडामार्ग रुग्णालय येथे तपासणी करण्याकरिता दाखल केले. यावेळी ते मद्यपान केलेले होते हे निष्पन्न झाले. म्हणून या चारही जणांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतले अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली आहे. संशयित चारही जण नॉर्थ गोव्यातील असून पोलीसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८५, २२१, ३(५), mv act १८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.