
कणकवली : कणकवली शहरातून गेलेल्या उड्डाणपुलाखाली गेली अनेक वर्ष मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून याबाबत व्यापारी संघाचे पदाधिकारी नागरीअ यांनी संबंधित शासकीय विभागांचे तसेच पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतरही काहीच कारवाई होत नसल्याबाबत कोकणसाद लाईव्ह आणि दैनिक कोकणसाद यांनी नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची व तत्काळ दखल घेऊन कणकवली नगरपंचायत प्रशासन, कणकवली पोलीस व आरटीओ विभागाचे अधिकारी कर्मचारी सोमवारी सकाळीच 'ऑन फिल्ड' उतरले आहेत. या तिन्ही विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी उड्डाणपूल गाठले असून उड्डाणपुलाखालील विविध वाहनधारक, विविध विक्रेते यांना आपापली वाहने, स्टॉल हटविण्याच्या सूचना केल्या जात आहेत. तर सूचनांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला जात आहे. उड्डाण पुलाखालील अतिक्रमणाबाबतच्या या समस्येला कोकणसाद लाईव्ह आणि दै. कोकण सादने वाचा फोडल्याबाबत कणकवलीकर नागरिकांकडूनही समाधान व्यक्त होत आहे.