रूग्णवाहीकेतून अवैध दारू वाहतूक...!

Edited by: विनायक गावस
Published on: March 12, 2024 10:06 AM
views 492  views

सावंतवाडी : आंबोली पोलीस तपासणी नाका येथे मंगळवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारा एक रुग्णवाहिका संशयास्पद रित्या येताना दिसली. या रुग्णवाहिकेला बाजूला घेऊन त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या दीपक शिंदे यांनी या रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्या रुग्णवाहिकेतून गोवा बनावटीची दारू आढळली. या रूग्णवाहीकेतून अवैध दारू वाहतूक करत असल्याचा संशय होता. काल रात्री या रुग्णवाहिकेला पकडण्यात यश आले. यावेळी रुग्णवाहिकेसह तब्बल साडे अकरा लाख लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई, अभिजीत कांबळे दीपक शिंदे यांनी केली. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम_65 (a)(ई),81,83 प्रमाणे आरोपी  नाव संजय मनोहर कल्याणकर ( वय  - 40  वर्षे ) , रा. शेंद्री रानातली वस्ती ता. गडहिंग्लज जिल्हा - कोल्हापूर, विनायक शिवाजी पालकर  वय-38 वर्षे रा. शेद्री मधलिगल्ली पो. बद्याचिवाडी ता.  गडींगलज कोल्हापूर, भिकाजी शिवाजी तोडकर ( वय - 43  वर्षे ) रा. शेद्रि ब्लोकवाडी ता. गडीगलाज जिल्हा - कोल्हापुर  यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 ‌