
कणकवली. : विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी विभागातील बी.ई. अंतिम वर्ष विद्यार्थी श्री. नितेश मोकल यांची आयआयटी मुंबई येथील प्रतिष्ठीत रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड झाल्याची आनंददायी बातमी आहे.
संशोधन क्षेत्रातील त्यांची उत्सुकता, सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगती आणि तांत्रिक कौशल्यामुळे मिळालेली ही संधी अत्यंत उल्लेखनीय आहे. आयआयटी मुंबईसारख्या नामांकित संस्थेमध्ये इंटर्नशिप मिळणे हे महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्या प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी श्री. अभय मराठे, ज्येष्ठ सदस्य श्री. जयंंत कयाळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांनी श्री. नितेश मोकल यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.










