राणेंच्या विरोधात बोलाल तर 'करेक्ट कार्यक्रम' करणार !

कणकवली भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांचा इशारा
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 19, 2022 12:41 PM
views 659  views

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे कुटुंबावर आमदार भास्कर जाधव यांनी केलेले आरोप  खोटे असून आम्ही भारतीय जनता पार्टीचे आरोपांचा निषेध करत आहोत. भास्कर जाधव ओरोसमध्ये येऊन त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यावर, तुम्ही जे चिपळूणमध्ये केलेले प्रकार ते उघडकीस आणण्यास आम्हाला वेळ लागणार नाही, असा इशारा कणकवली भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी दिला.

कानडे म्हणाले की, भास्कर जाधव चिपळूणमध्ये वाळू चोरी करून मोठे झालेले नेते म्हणून सध्या शिवसेनेचे मिरवत आहेत. त्यांनी आपल्या कार्यालयात इम्तियाज मुकादम याला वस्तीला बोलून ऑफिसमध्ये मारहाण केली. पेडणेकर पत्रकार यांना पहिल्या माळ्यावरून त्यांनी खाली ढकलले, हिंदू धर्माचे आराध्य दैवत शारदा देवी मातेच्या मंदिरामध्ये त्यांनी जी लोकांना शिवीगाळ केली होती. आपल्याच लोकांना शिवीगाळ करून त्यावेळी पण आपण पाहिलेली आहात, असा हा भास्कर जाधव आमच्या राणेसाहेबांवरती  शिवराळ बोलतात तुम्हाला दुसरी अजून एक गोष्ट सांगतो निष्ठावंत सचिन कदम याला ज्यावेळी तालुका पद चिपळूण चे घोषित झालं त्यावेळी या माणसाने धिंगाणा घातला होता. भास्कर जाधव याचं मानसिक संतुलन बिघडलेला आहे.  दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो राणेसाहेबांनी कोकणामध्ये भरपूर काय केलेलं आहे.  खूप काय केल होतस तर पवार साहेबांनी तुला नऊ खात्याचा मंत्री केला त्यांना खाद्याच्या मंत्रीपदाचा किती फायदा आपण चिपळूणला दिला? तो जर आपण सांगा? 

आम्ही ज्या पक्षाचा काम करत आहोत तो भारतीय जनता पार्टी एक सुसंस्कृत पक्ष म्हणून ओळखला जातो. तुम्ही एखादा अतिरेकी किंवा जो माणूस सिंधुदुर्गाच्या जिल्ह्याच्या विरोधात बोलणारा येत असेल तर त्याला त्याच बॉर्डरवर त्याची जागा दाखवण्याची तयारी आम्ही केलेली आहे. भास्कर जाधव या व्यक्तीने सिंधुदुर्ग भाषा वापरलेली आहे त्या शिवराळ भाषेचे उत्तर सिंधुदुर्गात आल्यानंतर आपल्याला दिले जाईल, असंही इशारा देण्यात आला आहे.