
कुडाळ : दीपक केसरकर हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. उद्धव ठाकरे यांनी कुडाळमध्ये सभा घ्यावी आणि जावे. परंतु दीपक केसरकर यांच्या विरोधात काय चुकीचं बोलाल तर जशास तसे उत्तर दिले जाईल असा थेट इशारा शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या कुडाळतील व सावंतवाडीतील सभेच्या पार्श्वभूमीवर हा इशारा शिवसेनेच्या वतीने पावसकर यांनी दिला आहे.