फोटो ऑलरेडी प्रसिद्ध झाले असतील तर, संजू परबांनी लोकांना दाखवावेत !

लॅंडमाफीयांची माहीती मला नाही : मंत्री दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: September 22, 2024 09:07 AM
views 418  views

सावंतवाडी : माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी म्हटलेल्या लॅंडमाफीयाची माहीती मला नाही. याबाबत त्यांनाच विचारल तर अधिक योग्य ठरेल. त्यामुळे ते लॅंडमाफीया कोण ? हे त्यांनाच विचाराव. त्या लॅंडमाफीयाची माहीती मला नाही. संजू परब यांना त्या लॅंडमाफीयाचे फोटो प्रसिद्ध करायला सांगावेत. ऑलरेडी प्रसिद्ध झालेले असतील तर लोकांना दाखवावेत अस विधान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केल. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उप नगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते.

 ते म्हणाले, जागा विकत घेण्याला माझा विरोध नाही. परंतु, १० रूपये द्यायचे अन १०० रूपयांवर सही घ्यायची हे चुकीचं आहे. मी हा लढा यापूर्वी देखील केलेला आहे. त्यामुळे असा लढा करणार की ती लोक पुन्हा जिल्ह्यात दिसणार नाहीत असा इशारा दिला. तर, मी टोकाला येईपर्यंत थांबतो. पण, एकदा टोकाला आलं की मग त्या लोकांना कशी जागा दाखावायची हे मला चांगलंच ठाऊक आहे. असा संघर्ष मी करतो तेव्हा संपूर्ण सिंधुदुर्गवासीय माझ्यामागे ठामपणे एकजुटीने उभी राहतात हा इतिहास आहे. तो इतिहास पुढेही दिसेल असं मत व्यक्त केले. 

राणेंना त्रास देणाऱ्यांना बदलण्याची मागणी !

युतीचा धर्म १०० टक्के पाळला जाईल, काही लोक नितेश राणे यांच्या मतदारसंघात त्यांना त्रास देण्याच काम करत आहेत. त्यांना बदलण्याची मागणी करणार पत्र मी आमच्या पक्षाला दिलं आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. युतीचा धर्म हा पाळलाच पाहिजे. माझ्याशी कोण कसं वागत हे बघत नाही. माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे. प्रवक्ता म्हणून मी कार्यरत आहे. असं असताना माझ्या जिल्ह्यात युती धर्म हा पाळला गेला पाहिजे. त्यामुळे काही बदल मी सुचविलेले आहेत.  इतर कोण असं करत असतली तर त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे त्यांच्या पक्षाने ठरवावं असही मंत्री केसरकर म्हणाले.