अजित पवारांनी 50 खोके घेतले असतील तर निश्चितच आंदोलन करू : प्रविण भोसले

अजितदादा आजही आदर्श ; मात्र, शेवटपर्यंत शरद पवार साहेबांसोबतच : अर्चना घारे-परब
Edited by: विनायक गावस
Published on: July 04, 2023 13:49 PM
views 148  views

सावंतवाडी : शिंदेच्या वर्षंपूर्तीला ५० खोक्यांच आंदोलन करणाऱ्या  राष्ट्रवादीला अजित पवारांच्या घडामोडीनंतर खोक्यांच आंदोलन करणार का ? 'गद्दार' म्हणणार का ? असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांना केला असता खोके एकनाथ शिंदेंच्यावेळी होते. आता अजित पवारांनी 50 खोके घेतले असतील तर त्याची चौकशी करू. ती कशी करायची हे आम्हाला चांगलं ठावूक आहे. जर घेतले असतील तर भावंडं असले तरी खोक्यांच आंदोलन करू, सध्यातरी अजित पवार खोकेवाल्यांसोबत आहेत हे स्पष्ट आहे. अजित पवार हे आमचे जवळचे आहे. त्यामुळे सध्या त्यांना गद्दार म्हणण योग्य नाही. येत्या काळात परिस्थिती स्पष्ट होईल. उद्याच्या बैठकीत मी स्वतः, सुरेश दळवी, व्हिक्टर डांन्टस, अर्चना घारे उपस्थित राहणार आहोत असं मत प्रविण भोसले यांनी व्यक्त केले.


अजित पवार यांचा आदर्श आजही आहे. परंतु ते कोणत्या दडपणाखाली गेले हे माहित नाही. यामागे ईडी आहे की अन्य ते पहावं लागेल. मात्र,आम्ही शरद पवार साहेबांसोबतच राहणार असल्याची स्पष्ट भुमिका अर्चना घारे-परब यांनी आज केले. दरम्यान, शरद पवार हे आता राज्यभर दौरा करणार असून ते कोकणात देखील ते येऊ शकतात असे घारे परब यावेळी बोलताना म्हणाल्या. सावंतवाडीत  कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, योगेश कुबल, हिदायतुल्ला खान, अँड. सायली दुभाषी, दर्शना बाबर देसाई, राकेश नेवगी, सावली पाटकर, सुर्यकांत नाईक आदी उपस्थित होते.