
सावंतवाडी : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून गावच्या विकासाच स्वप्न विविध पक्षांचे, पॅंनलचे उमेदवार दाखवत आहे. अशातच चराठा गावात अनोख्या पद्धतीने गावच्या अडचणींची व्यथा मांडलीय. या गावातील विहीरीच बोलू लागलीय, या पत्रकात विहीर म्हणतेय,मी विहीर बोलते.माझे गांव चराठा, तिलारी कॉलनीच्या मागे आहे. माझा जन्म २० वर्षापुर्वीच झाला. मी अशीच २० वर्षे बिनकामी पडुन आहे. ज्या जनतेची तहान भागवण्यासाठी माझा जन्म झाला, त्याचा उपयोग न करता मी अशीच पडुन आहे. माझा वापर का करत नाही, की माझ्याकडुन काही चुक झाली ? म्हणून माझा तुम्ही द्वेश करत आहात? आता तर पंप बसविण्याची निवीदा ३ महिन्यांपुर्वीच झाली तरी सुद्धा तुम्ही पंप बसविण्याचे काम करत नाही आहात, आता तरी त्या तहानलेल्या जनतेसाठी माझा तुम्ही उपयोग करुन घ्या. जेणेकरुन माझा जन्म सार्थकी लागेल. अशी भावना या विहरीन व्यक्त केली असून प्रचारात ह्या विहीरच मनोगत लक्ष वेधून घेत आहे.