राजकीय हेतू साध्य करण्यासाठी मी कधीच कार्यक्रम घेतले नाहीत : विशाल परब

Edited by: भरत केसरकर
Published on: October 16, 2023 18:43 PM
views 265  views

सावंतवाडी : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी मी कधीच कार्यक्रम घेतले नाही. समाजसेवा आणि जनतेसाठी काम करणे हाच या मागचा उद्देश आहे. त्यामुळे आमदार खासदार याबाबत होणारी चर्चा ही चर्चाच आहे. येत्या काळात जिल्ह्यात आयटी पार्क तसेच पर्यटनावर आधारीत प्रकल्प उभे करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सर्वानी पुढे यावे असे आवाहन भाजपा युवा नेते उद्योजक विशाल परब यांनी केले.

तर मी कोणाचा राजकीय स्पर्धक नाही किंवा मला कोणाशी स्पर्धाही करायची नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे.त्यामुळे माझे राजकीय भवितव्य हा येणारा काळ ठरवेल असेही विशाल परब म्हणाले. 

विशाल परब यांनी आज येथे पत्रकार परिषद घेऊन विशाल अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला त्या सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी त्यांच्यासोबत तेजस माने,प्रथमेश कामत,विकास परब,ओंकार पावसकर आदी उपस्थित होते. 

विशाल परब पुढे म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ मोठे कार्यक्रम आयोजित करण्यामागे विशाल परब यांचा राजकीय हेतू असल्याची चर्चा आहे शहरात लागलेले बॅनर व व त्यांनी केलेली भाषणे यातून भविष्यात आमदार किंवा खासदारकीसाठी माझा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे परंतु असा कुठलाही हेतू किंवा स्वार्थ या मागे नसून केवळ आणि केवळ जनसेवा आणि समाजसेवक म्हणून मी पाहत आहे.

आपण या आधीही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येथील जनतेला सहजरित्या पाहताना येणारे कार्यक्रम आयोजित केले आहे. भविष्यातही यापेक्षाही कार्यक्रम आयोजित करण्यात परंतु त्यामध्ये माझा कुठलाही राजकीय स्वार्थ नसणार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी कधीच कार्यक्रम घेतले नाहीत त्यामुळे मी राजकीय स्पर्धेत आहेत असा गैरसमज कुणी करू नये. माझं राजकीय भवितव्य काय असेल हा येणारा काळच ठरवेल असे विशाल परब यावेळी बोलताना म्हणाले.