
सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात मंत्री दीपक केसरकर यांच्यावर स्थानिक भाजप नेत्यांकडून टिका केली जात आहे. यासंदर्भात विचारल असता ते म्हणाले, ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो. राज्यात युतीचे सरकार आहे. शिवसेनेत माझे चांगले संबंध आहेत त्याहून अधिक भाजपात आहेत हे टिका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं. आपण मित्रपक्ष आहोत. दोन्ही मित्रपक्षांनी जनतेच्या विकासासाठी एकत्र येऊन काम केल पाहिजे. मला व्यक्तिगत टार्गेट करून काहीही साध्य होणार नाही. विकासासाठी एकत्र येत काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे या संदर्भात मी वरिष्ठांशी बोललो आहे. वरिष्ठांकडून आवश्यक त्या सुचना संबंधितांना येतील, असं मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, मोती तलाव हे शहराचे वैभव आहे. शहराच्या सौंदर्यात सौंदर्यात बाधा येत असलेल चालणार नाही. त्या ठिकाणचा आठवडा बाजार अन्यत्र हलविण्यासाठीच्या पर्यायी जागा सुचविण्यास हरकत नाही. याबाबत बैठक घेवून सर्वांना सोबत घेऊन निर्णय घेतला जाईल. तर करवाढीला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे.करवाढीचा निर्णय घेताना नागरिकांना विचारात घेऊनच निर्णय होईल. मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत मला कल्पना दिली नाही. निर्णय घेताना मला विश्वासात घेतले नाही अशी माहिती त्यांनी दिली. तर सुधारण्यासाठी एक संधी प्रत्येकाला दिली जाते तशी यांनाही दिली आहे. सुधारणा न झाल्यास कारवाई होईल असं ते म्हणाले.