'दान करण्याचं 'वरदान' माझे गुरु निलेश राणेंकडून मला मिळालं !'

भाजपचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांचे भावनिक उदगार !
Edited by: भरत केसरकर
Published on: October 12, 2022 21:43 PM
views 289  views
हायलाइट
वेंगुर्ल्यात रंगली "विशाल श्री" शरीर सौष्ठव स्पर्धा
गोव्याचे आमदार जीत आरोलकर यांची प्रमुख उपस्थिती
संजू परब यांचीही उपस्थिती

वेंगुर्ला : भाजपचे युवा नेतृत्व तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित  "विशाल श्री" शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून गोव्याचे आमदार आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर युवा उद्योजक विशाल परब, भाई सावंत, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे, ओरोस भाजप मंडल अधिकारी दादा साईल, अक्रम खान, प्रितेश राऊळ, भाई राणे, राजन गिरप, दादा साईल, सुहास गवंडळकर, वसंत तांडेल, अनंत परब, किशोर सनसुरकर, प्रणव वायंगणकर, प्रशांत आपटे, बाळू देसाई, अँड. अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.

"विशालची आणि माझी 2008 मध्ये ओळख झाली. अतिशय मनमिळाऊ व मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख आहे. विशाल च्या सर्व इच्छा परमेश्वराने पूर्ण कराव्यात, असे सांगत विशाल परब यांचे जीवलग मित्र सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी शुभेच्छा दिल्या.

युवा नेते विशाल परब म्हणाले, "तुमच्या शिवाय कार्यक्रम होण शक्य नाही. मी फक्त नाममात्र आहे. संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी, माझे सहकारी मित्र, प्रेमी यांनी हे आयोजन केलय ते मी आयुष्यात विसरू शकत नाही. यावर्षी सर्व कार्यकर्त्यांनी ठरवल की आठ दिवसाचे कार्यक्रम करूया. ते पण गोरगरीब जनतेसाठी. आजच मी मुंबईत निलेश राणे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन विनंती केली की १५ ऑक्टोबरला वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहावे. ह्या दोन्ही नेत्यांनी येण्याचे आश्वासन दिले आहे. मला आनंद आहे महाराष्ट्रातील हे दोन द्विगज नेते एकाच व्यासपीठावर येणार असून त्यांना एकत्र आणण्याच योग मला आणता आला, याचा फार आनंद होतोय.  मी ६५ कातकरी मुलांना दत्तक घेतलय. हा माझ्या जीवनातील एक सर्वात मोठा क्षण आहे. शंभर रूपये कमवले तर दहा रूपये जनतेतील सर्व सामान्य लोकांसाठी खर्च करावेत, हे मला माझे गुरु निलेश राणेंनी शिकवल आहे.

भविष्यात वेंगुर्ल्यात सर्वात मोठा मत्स्य महोत्सव आयोजन करण्याचा माझा मानस असून तो भव्यदिव्य असेल, अशी घोषणा विशाल परब यांनी यावेळी केली.