गावच्या वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घ्यायला आलो : नारायण राणे

कलमठ विभाग कार्यकर्ता संवाद मेळावा
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 12, 2024 04:55 AM
views 358  views

कणकवली : माझ्या गावच्या वडीलधारी मंडळी चे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. लोकसभा मतदारसंघ निवडणूक होत आहे, मी वरवडे गावचा एक शेतकऱ्यांचा मुलगा, पहिली पर्यंत शाळेत जायचो. मी देश पातळीवर काम करतो, मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मध्ये पाचव्या क्रमांकावर बसतो. मी साहेब नाही, जनतेचा सेवक आहे. कधी कोणाशी माझे भांडण झाले नाही. मी गरिबी पहिली आहे,अनुभवली आहे. आपल्या गावातील मातीत ताकद आहे, मेहनत करा, कष्ट करा. वरवडे गावातील एक मुलगा मंत्री, केंद्रात मंत्री झाला. दहा पदावर काम केलं.आपसात स्पर्धा करु नका.

कलमठ विभागीय कार्यकर्ता संवाद मेळाव्यात  केद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते .यावेळी आमदार नितेश राणे,माजी सभापती प्रकाश सावंत,तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संतोष कानडे, तालुका उपाध्यक्ष महेश गुरव,सोनू सावंत,अशोक राणे,नितीन पटेल,सुनील नाडकर्णी भाजप युवा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,शिवसेनेचे कणकवली शहर अध्यक्ष प्रमोद मसुरकर यांच्यासह विभागातील सरपंच,उप सरपंच,सदस्य आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

ना.नारायण राणे म्हणाले,मी गावात आल्यावर माझे वडील चार वर्षे बेडवर होते,मी बारा वर्षे असताना दिवसा काम आणि रात्री शाळेत शिकलो .५ हजार ऊसणे घेवून फटाक्यांचे दुकान चालू केलं.मी आमदार होई पर्यंत रस्ता नव्हता,पाणी नव्हते,माझ्या गावतील स्थिती सांगतोय.मुख्यमंत्री असताना केलेल्या कामामुळे नारायण राणे नाव आले की लोक थांबलाच पाहिजे.अजूनही माझ्यात बदल झाला नाही.मी केवळ राजकारणी नाही,आम्ही व्यावसायिक आहोत.

सी वल्ड आणला पण शेतकऱ्यांनी विरोध केला.आम्हाला नको,असे सांगितले.लोकांची मानसिकता नाही.सांगवे मध्ये एका मुलीने गवती चहा प्रकल्प केला आहे,7 हजार रुपये किलोने ते तेल विकणार आहे.काम आणि कर्तुत्वाने मी मोठा झालो आहे,माझ्या भूमीतील माणसांची कौतुक मी करतो.आपणही केलं पाहिजे.माझ्या यशाचे कारण हे कुठलेही वेसन नाही,असेही ना.राणे सांगितले.

मी लोकसभेच्या निवडणुकीत स्पर्धेत आहे,मत मागण्यासाठी नाही.गावागावात रस्ते नाही,पाणी नाही,अशी परिस्थिती होती.त्यावेळचा काळ आठवा.आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला सुसाट वेगाने प्रगती करण्यासाठी साथ द्या.माझ्या वडीलांप्रमाने कुणाचा मृत्यू होवू नये म्हणून हॉस्पिटल काढले.जिल्ह्यातील मुले डॉक्टर व्हावेत,म्हणून मेडिकल कॉलेज काढले. समजातील मुलांसाठी हे कॉलेज आहे,त्याचे कौतुक कुणाला नाही.लोकांनी आशीर्वाद म्हणून १०० टक्के मतदान करा,ज्या प्रकारचा विकास द्यायला तयार आहे.एक नारायण राणे बनून चालणार नाही.अनेक नारायण राणे बनले पाहिजेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा बनविण्यासाठी आपल्या गावातील खासदार पाठवा.