मी खासदारकीचा उमेदवार नव्हे तर....

पहा काय म्हणाले किरण सामंत....
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 15, 2022 22:00 PM
views 1532  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष मजबूत होईल. देवगड,आचरा, मालवण, कुडाळ, कणकवली या ठिकाणी काही बैठका घेत कार्यकर्त्यांची संवाद साधला. त्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आगामी काळात आमचा पक्ष जिल्ह्यात मजबूत होईल. मी खासदारकीचा उमेदवार नव्हे तर पक्षांनी दिलेली जबाबदारी म्हणून काम करत आहे. आगामी काळात बाळासाहेबांच्या शिवसेना सिंधुदुर्गात मजबूत करणार असल्याची माहिती उद्योजक, बाळासाहेबांची शिवसेना नेते किरण सामंत यांनी दिली. कणकवलीत बाळासाहेबांची शिवसेना नेते किरण सामंत दाखल होताच जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे,सुनिल पारकर, संदेश पटेल, विलास साळसकर,भास्कर राणे, भूषण परुळेकर, शेखर राणे, दिलीप घाडीगावकर, दामोदर सावंत, बाळू पारकर, शैलेश सावंत आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

खासदारकी लढवणाऱ्या प्रश्नावर त्यांनी चेहऱ्यावर हास्य आणत आपण पक्ष मजबूत करणार आहे. दोन्ही जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी केली जाईल. भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश घेतले जाणार नाहीत. आमच्या शिवसेनेत इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे २० ऑक्टोबरला मालवणमध्ये मोठा मेळावा घेतला जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, ना. दीपक केसरकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, नामदार रविंद्र चव्हाण या सर्व नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे किरण सामंत यांनी सांगितले.