नगराध्यक्षपदासाठी माझीही मुलाखत, भाजपातून इच्छुक: अन्नपूर्णा कोरगावकर

Edited by: विनायक गांवस
Published on: November 15, 2025 09:05 AM
views 79  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितली असल्याची माहिती इच्छुक उमेदवार माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी दिली. भाजपने आपलीही मुलाखत घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली.

सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी नगरपरिषदेतील आपल्या पूर्वीच्या कामाच्या अनुभवाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, यापूर्वी मी सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले आहे. नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि प्रभारी नगराध्यक्ष म्हणून मी जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे मला नगरपरिषद कामाचा दांडगा अनुभव आहे. महिलांसाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनुभवाच्या आधारावरच भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. माझी मुलाखतही घेण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप पक्षात काम करत असताना सार्वजनिक जीवनात आपण समाजकल्याण करत आहोत. जनतेच्या प्रश्नांची जाणीव ठेवूनच आपण काम करत असल्याचे सौ. कोरगावकर यांनी सांगितले.