नारायण राणेंच्या मुशीतला मी शिवसैनिक..!

आमच्यातही धमक आहे : संजू परब
Edited by:
Published on: April 20, 2025 19:55 PM
views 109  views

सावंतवाडी : उदय सामंत जिथे हात लावतात तिथे सोनं करतात. या मतदारसंघात संघटना मजबूत करण्याच काम आम्ही करू. काहीजण स्वबळाची भाषा करत आहेत. दोडामार्गात तीन सदस्य मागितले होते.‌ मात्र, आम्हाला दिले नाहीत. आम्ही सहकारी संस्था पूर्णपणे ताब्यात घेत समोरांच्यांना एकही जागा जिंकता आली नाही. नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली काम केलेला मी शिवसैनिक आहे. धमक आमच्यात पण आहे असं मत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केले. 

मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा सदस्य नोंदणी शुभारंभ करण्यात आला.‌ यावेळी श्री. परब पुढे म्हणाले, सावंतवाडीच्या नगरपरिषदेत १७ पैकी १७ नगरसेवक आणि नगराध्यक्ष आमचाच असेल असा विश्वास व्यक्त जिल्हाप्रमुख संजू परब यांनी करत मित्रपक्ष भाजपच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. तसेच जिल्ह्यात आमचे दोन आमदार आहेत याचीही जाणीव ठेवा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राणे-केसरकरांवर प्रेम करणारी जनता या मतदारसंघात आहेत. निश्चितच आगामी निवडणूकीत शिवसेना अग्रस्थानी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.