
सावंतवाडी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेला वीस दिवस उलटून गेले तरी पोलिस मुख्य आरोपींना अटक करु शकले नाहीत. संतोष देशमुख यांची निघृण पणे हत्या करणाऱ्या संशयीत सर्व आरोपींना त्वरीत अटक करण्यात यावी व या हत्तेला जबाबदार असणाऱ्या सर्वानाच कठोर शिक्षा करावी यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकारी हेमंत निकम यांना निवेदन देऊन मराठा समाजाच्या भावना शासना पर्यंत पोचविण्याची मागणी करण्यात येणार आहे अशी माहिती सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिली आहे.सोमवार दि ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी हेमंत निकम यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. सकल मराठा समाज बांधवांनी प्रांताधिकारी कार्यालयात उपस्थित राहवे असे आवाहन सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.