
सिंधुदुर्गनगरी : जि.प.सिंधुदुर्ग येथे २०१९ मध्ये पवित्र पोर्टल मार्फत ७६ गणित/विज्ञान पदवीधर शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेली होती. त्यापैकी ७३ पदवीधर शिक्षकांनी ३ वर्ष समाधानकारकरित्या शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर या शिक्षकांचे नियमित आदेश निर्गमित करतांना चुकीचे पद व वेतनश्रेणी देण्यात आली.
या शिक्षकांना नियमित पदवीधर वेतनश्रेणी द्यावी या मागणीसाठी आता महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्गने बुधवार १० तारीखपासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. उपसचिव,ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की,२०१९ मध्ये नियुक्त प्राथमिक पदवीधर शिक्षकांना “गणित/विज्ञान प्राथमिक पदवीधर शिक्षक हे पद व वेतनश्रेणी एस-१४” देण्यात यावी.
पदवीधर शिक्षकांना त्यांचे पद व वेतनश्रेणी देण्यास जि.प. सिंधुदुर्ग टाळाटाळ करत आहे असे संघटनेला निदर्शनास आल्याने संघटनेने पुन्हा ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन व शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा करण्यात आला. पुन्हा उपसचिव, ग्रामविकास विभाग, तसेच उपसचिव, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे अर्धशसकीय पत्र निर्गमित करण्यात आले.त्यात सुद्धा उपरोक्त
२०१९ मध्ये नियुक्त प्राथमिक पदवीधर शिक्षकांना “गणित/विज्ञान प्राथमिक पदवीधर शिक्षक हे पद व वेतनश्रेणी एस-१४” देण्यात यावी. असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे.तरीसुद्धा जि.प.सिंधुदुर्ग वरील विषयाकडे हेतूपरस्पर दुर्लक्ष करत आहे असे संघटनेला निदर्शनास आल्याने एक दिवसीय धरणे आंदोलन ७ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आलेले होते.
या आंदोलनाची दखल घेत आंदोलनाला प्रत्यक्ष शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी भेट घेतली व संघटनेला आश्वासित केले की गणित/विज्ञान पदवीधर शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध होताच उपरोक्त पदवीधर शिक्षकांना “गणित/विज्ञान प्राथमिक पदवीधर शिक्षक हे पद व वेतनश्रेणी एस-१४” देण्यात येत आहे.त्यामुळे शिक्षणाधिकारी यांच्या शब्दांवर संघटनेने विश्वास दाखवत तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले होते. पदवीधर शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणी एस-१४ असलेले सुधारित आदेश निर्गमित होण्यास जि.प.सिंधुदुर्ग ची उदासिनता, टाळाटाळ,प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे हे निदर्शनास संघटनेला नाईलाजास्तव तीव्र स्वरूपाचे बेमुदत साखळी उपोषण करण्यास जि.प.सिंधुदुर्ग ने भाग पाडले आहे.
वेतनश्रेणीचे सुधारित आदेश निर्गमित होईपर्यंत तीव्र स्परूपाचे निरंतर बेमुदत साखळी उपोषणाला सुरवात करण्यात येणार आहे.आणि यावेळी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन स्थगित होणार नाही.असा इशारा जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी केले आहे.