
मालवण : मसुरकर जुवा बेटाजवळ बेकायदा वाळू उपसा होत आहे. त्यामुळे धूप प्रतिबंधक बंधारा खचत आहे. महसूल विभागाला वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या वाळू माफियांवर कारवाई न झाल्यास उपोषणास बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थ विश्वास मसुरकर यांनी दिला आहे.
मसुरकर यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मसुरे कावावाडी कालावलखाडी पात्र मसुरकर जुवा बेट स्थानापन्न आहे. बेटावर लोकवस्ती होळदेव, महापुरुष, भवानीदेवी हि पूर्वापार देवस्थाने आहेत. बेटाचा पुर्वेकडील बराचसा भाग नदिला येणाऱ्या पुराने बेटाचा भाग वाहून गेलेला आहे. या बेटाला संरक्षण म्हणून आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने बेटांस धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम मंजूर असून बांधकाम चालू आहे. या बेटाच्या पुर्वेकडे माझे वहिवाटीची जमीन माडबाग आहे. सर्व्हे नंबर १५/८ या क्षेत्राचा बराच भाग पाण्यात वाहुन गेला आहे. वेळोवेळी सरकार दरबारी मी स्वतः याबाबत या पुर्वेकडील १०० मीटर भागात वाळू उपसा करु नये याबाबत तहसिलदार, मालवण बंदर अधिकारी, खनीज उत्पन्न ओरोस या ठिकाणी अर्ज केला आहेत. मात्र त्याची चौकशी माझे समक्ष झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी वाळू माफीया वाळूची बेकायदा उपसा करत आहे. माझा फक्त मसुरकर बेटाच्या पुर्वेकडील भागापूरताच अर्ज आहे. अन्य भागांत वाळूच्या उपश्याशी माझा काही संबंध नाही. आता सर्व वाळूचे साठे संपले असून फक्त बेटाच्या पूर्वेकडील भागांत व बेटाला धूप प्रतिबंधक बंधारा घातलेल्या ठिकाणी वाळूसाठा आहे. मात्र वाळू माफीया बेकायदा वाळूचे उपसा रात्री करतात. त्यामुळे बेटाला ४ वर्षापूर्वी घातलेला दगडी बंधारा खचत आहे.
सरकारचा पैसा वाळू माफीयांकडून पाण्यात जात आहे व सरकारी वाळू बेकायदा उपसा करुन शासनाचे नुकसान वाळू माफीया करीत आहेत. याची जबाबदारी शासकीय अधिकारी घेणार काय? रात्रीच्या वेळी व माझी पत्नी नदी काठावर यांची पाहणी करता या वाळू माफीयाकडून आमच्यावर हल्ला झालेस या यंत्रणांना जबाबदार घरावे. पोलीस पाटील मसुरे कावावाडी यांना वेळोवेळी यांची माहिती दिली. पोलीस पाटील कावावाडी यांनाही सांगितले. मंडळ अधिकारी मसुरे फोन उचलत नाही. तहसिलदार मालवण यांचेकडेही फोन केला कोणी दखल घेत नाही. वाळूची प्रत्यक्ष पाहणी केलेस माफीया सापडतील यांच्यावर कारवाई न केल्यास तलाठी कार्यालय मसुरे येथे उपोषणास बसावे लागेल असा इशारा मसुरकर यांनी निवेदनातून दिला आहे.












