
देवगड : पोयरे येथील सातवण जंगलमय भागामध्ये एक मानवी कवटी व काही हाडे मिळून आलेले आहेत. सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बगळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम, पोलीस हवालदार आशिष कदम, संतोष नाटेकर, स्वप्निल ठोंबरे, प्रसाद आचरेकर असे घटनास्थळी भेट दिली.
त्या ठिकाणी काही वस्तू, बॅग, मोबाईल, कपडे, अंगठी, छत्री वगैरे आहेत. कवटीच्या शेजारी काजूच्या झाडाला दोरीचा गळफास लावलेला आढळून आलेला आहे. मयताच्या शरीराचे इतर अवशेष हे जंगली श्वापदांनी खाल्ले असल्यामुळे मिळून आलेले नाहीत. दि.16/08/2023 रोजी पोयरे गावठाण गावातून नापत्ता झालेला. राजेंद्र दामाजी मयेकर वय 41 याची पत्नी रसिका मयेकर हिला व इतर नातेवाईक यांना दाखवले असता त्यांनी सदरच्या वस्तू ओळखून सदर मयत हा तिचा पती राजेंद्र दामाजी मयेकर असल्याचे सांगितले आहे.
सदर बाबत मिळालेली हाडे व अवशेष हे DNA प्रोफाइलिंगसाठी केमिकल ऍनालायजर यांच्याकडे पाठवण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. तसेच सदर प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम हे करीत आहेत.