हक्काच्या पेन्शनसाठी कर्मचारी संपाला दोडामार्गमध्ये मोठा पाठिंबा

कर्मचाऱ्यानी पंचायत समिती कार्यालयासमोर मांडले ठाण
Edited by: संदीप देसाई
Published on: March 16, 2023 19:13 PM
views 125  views

दोडामार्ग : राज्यभरात जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनांनी गेल्या तीन दिवसापासून सुरू केलेल्या बेमुदत संपत दोडामार्ग तालुक्यातील कर्मचारी सुद्धा सहभागी झाले आहेत. त्यांचा या हक्काच्या पेन्शनसाठी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर जोरदार एल्गार सुरू आहे.

संपूर्ण राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी संगणक संघटनात्मक एकीची ताकद दाखविली जात असताना दोडामार्ग तालुक्यात सुद्धा जिल्हा परिषदचे कर्मचारी या आंदोलनात संघटितपणे सहभागी झाले असून हक्काच्या पेन्शन योजनेसाठी संप कालावधी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या करत शुक्रवारी तिसऱ्या दिवशी या  कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काच्या पेन्शन योजनेसाठी जोरदार नारा दिला.

राज्यात सुरू असलेल्या संपाला जोरदार समर्थन असल्याचे सांगत, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची असे ठणकावले आहे. यामध्ये तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे कर्मचारी, ग्रामसेवक वर्ग, आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या मागणीबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं आहे.