दोडामार्ग वर्षा मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद ; तब्बल ६५० स्पर्धकांचा सहभाग

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
Edited by: संदीप देसाई
Published on: September 03, 2023 20:12 PM
views 123  views

दोडामार्ग : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रवीवारी आयोजित केलेल्या दोडामार्ग मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला.  तालुक्यातील तब्बल साडेसहाशे विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. तालुक्यात प्रथमच अशी भव्य मॅरेथॉन झाल्याने ही स्पर्धा लक्षवेधी ठरली.

   माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी शाळेच्या पटांगणावर उपस्थित स्पर्धकांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले. दौड आयुष्यात किती फायदेशीर आहे हे सांगताना त्यांनी जीवनात शारीरिक तंदरुस्ती साठी व्यायाम महत्वाचा आहे. आणि धावण्यातून सर्वात जास्त व्यायाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा अतिशय सुरेख पद्धतींन इथल्या तकमे आयोजित केल्या बद्दल तालुका शिवसेना टीमच कौतुक केलं.

     या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन सुधीर सावंत यांचे हस्ते झाले, पोलीस प्रशासन आणि माध्यमिक व प्राथमिक मधील क्रीडा शिक्षक तसेच यांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. मुलींचा सहभाग या मॅरेथॉन मध्ये लक्षणीय होता. लागलीच स्पर्धा संपल्या नंतर दीड किलोमीटर, ३ व  ५ किलोमीटर वयोगट व मुले व मुली अशा स्वतंत्र गटात ही स्पर्धा पार पडली. यात प्रत्येक गटातून  वीजेत्या प्रथम १० जणांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार व शिवसेना नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत, सोबत तालुकाप्रमुख तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, ज्येष्ठ शिवसैनिक भाई परेकर, तुकाराम बर्डे, मनीषा गवस, यांसह चेतना गडेकर, शैलेश दळवी, सूर्यकांत गवस, गोपाळ गवस, दयानंद धाऊसकर, प्रवीण गवस, महाले, भगवान गवस, रामदास मेस्त्री, तिलकांचन गवस, संजय गवस, हर्षद सावंत, शेटये, ज्ञानेश्वर शेटवे, सरपंच अस्मिता नाईक, विशाखा नाईक, रत्नकांत कर्पे, शशी गवस, गुरू देसाई, गुरू सावंत आदी उपस्थित होते. 

मॅरेथॉन ठरली लक्षवेधी

खरंतर जुलै महिन्यात होणारी दोडामार्ग तालुका मॅरेथॉन स्पर्धा रविवारी संपन्न झाली या स्पर्धेचं तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस व त्यांच्या टीमने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केलं त्यामुळे तब्बल साडेसहाशेहून अधिक स्पर्धक विविध गटातून या स्पर्धेत सहभागी होऊन सुद्धा शिवसेने केलेल्या टीमवर्कमुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी होऊन सबंध तालुक्यात लक्षवेधी ठरली एक प्रकारे या स्पर्धेच्या निमित्ताने दीपक केसरकर यांच्या टीमने शक्ती प्रदर्शन केल्याचं चित्र या निमित्तानं दिसून आलं.