हुडोत्सवातील धुळवडीची अशी आहे अनोखी परंपरा !

Edited by: विनायक गांवस
Published on: March 30, 2024 06:30 AM
views 398  views

सावंतवाडी : जगप्रसिद्ध असणाऱ्या हुडोत्सवात सहाव्या दिशवी कुणकेरी येथे परंपरेनुसार होळी व हुडा याचेवर धूळ मारून धुळवड साजरी केली गेली. त्यानंतर हुड्याच्या समोर तिन्ही देवांच्या अवसारात संचार येऊन ग्रामस्थांना पुढील विधींना शुभाशिर्वाद दिला.  त्यानंतर रात्री पेटत्या शेणी मारण्याचा कार्यक्रम पार पडला. 

हा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळपासच्या गावातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. शेणी जाळून झाल्यावर श्रींचे रोंबाट पुन्हा चव्हाट्यावर येऊन कवळे जाळण्याचा कार्यक्रम केला. यामध्ये कवळे जाळीत असताना हुडा आणि मुख्य होळी यांच्या सभोवती वाजत-गाजत धावत फेऱ्या मारल्या. मात्र, वैशिष्ट्य असे की पेटत्या आगीतून धावत असताना कोणालाही कसल्याही प्रकारची इजा पोहोचत नाही.