जीवाचं रान करून फुलवलेली बागायती हत्तींनी केली उध्वस्त

Edited by:
Published on: February 01, 2025 13:11 PM
views 316  views

दोडामार्ग : केर येथे हौदस घालणाऱ्या जंगली हत्तींनी चंद्रकांत देसाई यांच्या बागयतीत पहाटे शिरून नारळ व सुपारी बागायत जमीन दोस्त केली. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.  प्रचंड मेहनत करून उभी केलेली बागायती डोळ्या देखत हंत्ती उडवत असल्याने त्यांनी वनवीभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

केर मोर्ले हेवाळे परिसरात उच्छाद माजवणाऱ्या हंत्तीची संख्या आता ५ वर पोहचली आहे. एक टस्कर हंत्ती कडून होणारे नुकसान आता चौपटीने वाढले आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी टस्कर हत्तीने यां ठिकाणी आपला हौदस माजवीला होता. आता त्याच्या बरोबर आणखी दोन पिल्ले व दोन हंत्ती आल्याने मोरले, केर परिसरात ५ हत्ती वाढल्याने ग्रामस्त शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दिवस रात्र हे हत्ती अतोनात नुकसान करीत आहेत. लहान पिल्ले असल्याने आता आणखीन भीती वाढली आहे. हे हत्ती कोणत्याही क्षणी माणसावर हल्ला करू शकतात. त्यामुळे आता तरी वनविभागाने जागे होऊन हत्ती पकड मोहीम राबवावीच हीच मागणी शेतकरी करत आहेत.