वामनआश्रम स्वामींच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात

तीन जण गंभीर जखमी ; ओरोसनजीकची घटना
Edited by: गुरुप्रसाद दळवी
Published on: September 13, 2022 16:50 PM
views 218  views

सिंधुदुर्गनगरी : कणकवलीवरून सावंतवाडीच्या दिशेने जात असताना कणकवली चातुर्मासानिमित्त आलेल्या वामन आश्रम स्वामींच्या गाडीच्या ताफ्यातील एका टेम्पो ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला.  या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले.  जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडीची पुढची चाके निखळल्याने हा अपघात एवढा भीषण होता गाडीला धडक बसून गाडी रस्त्यावर पलटी झाली होती. ओरोसनजीक हा अपघात झाला.   


यावेळी या मार्गाने प्रवास करणारे  बापर्डे गावचे सरपंच संजय लाड  सामाजिक कार्यकर्ते जीवन नाईकधुरे,संतोष दुसनकर व लक्ष्मण परब यांनी इतर लोकांच्या मदतीने गाडीखाली सापडलेल्या डायव्हर ला जीवदान दिले. चालकांची स्थिती गंभीर असल्यामुळे ओरोस जिल्हा  रुग्णालयात दाखल करण्यात आले.