
वेंगुर्ला : संपूर्ण महाराष्ट्रात उबाठा शिवसेनेच्या वतीने घेण्यात येणार होऊ दे चर्चा अभियान दौरा सुरू असून लोकांचा याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वेंगुर्ला तालुक्यात शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक ०३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता होडावडा बाजारपेठ व दुपारी १२.३० वाजता शिरोडा बाजारपेठ येथे "होऊ दे चर्चा अभियान" कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी दिली आहे.
उबाठा शिवसेनेचे उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, अभियान निरिक्षक गुरूनाथ खोत, मीना कांबळी, आमदार वैभव नाईक, पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या अभियानाद्वारे बाजारपेठेत लोकांसोबत चर्चा करून भाजप सरकारने मागच्या ९ वर्षात अच्छे दिनाच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करून दिलेल्या आश्वासनांचे काय झाले याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेशजी परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी देत या अभियानाला तालुक्यातील सर्व बेसिक, महिला, युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.