ह्युमन राईट देवगडच्यावतीने नारी शक्तीचा सन्मान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 11, 2024 13:04 PM
views 51  views

देवगड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देवगड तालुका संघटनेच्या वतीने तालुक्यातील उत्तम कामगिरी बजाणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देवगड तालुका संघटनेच्या महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी- श्रीमती वृषाली यादव, मंडळ अधिकारी- सौ.रेश्मा कडूलकर, पडेल ग्रामसेविका सौ.प्रीती ठोंबरे यांचा तसेच अन्य क्षेत्रातील नारी शक्तीचा संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी देवगड तालुका महिला संघटक सौ.आदिती तानावडे, संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष- मंदार काणे, तालुकाध्यक्ष- आसिफ मुल्ला, सचिव- महेंद्र देवगडकर, शेखर दोडामणी, बोडस त्याचप्रमाणे पडेल गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.