असनियेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Edited by: विनायक गांवस
Published on: June 18, 2025 21:46 PM
views 413  views

सावंतवाडी : इंडिया प्रोटेक्टीव्ह पेन्ट व माऊली ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच दरवर्षीप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर शाळेचे संस्थापक तथा माजी सरपंच एम. डी. सावंत, इंडिया प्रोटेक्टीव्ह पेन्टचे मॅनेजर यशवंत सावंत, भाजपाचे क्रिडा संयोजक गुरुनाथ कल्याणकर, माऊली विकास मंडळाचे सचिव उमेश सावंत, आरोग्य अधिकारी श्री. माणगावकर, आरोग्य सेवक संतोष पारधी, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण सावंत, पोलिस पाटील विनायक कोळापटे, पत्रकार दत्ता पोकळे, शाळेच्या मुख्याध्यापिका जान्हवी सावंत आदी मान्यवर तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय समोर ठेवून त्या दृष्टीने जिद्द व चिकाटीने प्रयत्न करून यशस्वी होण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रशालेतून इयत्ता दहावीत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्याआर्यन लवू गावडे, तन्वी शंकर ठिकार, श्रेया लक्ष्मण सावंत या विद्यार्थ्यांचा  मान्यवरांच्याहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांना वह्या व छत्र्यांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जान्हवी सावंत यांनी सुत्रसंचालन परेश देसाई यांनी तर आभार श्री राठोड यांनी मानले.